Realme 9i 5G Launch Date: Realme 18 ऑगस्ट रोजी भारतात आपला Realme 9i 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Realme 9 मालिकेतील पुढील फोनची घोषणा करताना, Realme 9i 5G लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Realme 9i चा 5G प्रकार आहे, जो या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता. या फोनच्या लॉन्चची घोषणा करण्याव्यतिरिक्त, Realme च्या Realme 9i 5G ची प्रमुख फिचर्स देखील समोर आली आहेत.


Realme 9i 5G चा लॉन्च इव्हेंट 'या' दिवशी


Realme 9i 5G चा लॉन्च इव्हेंट 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल. कंपनीने म्हटलंय की, यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर हा इव्हेंट लाईव्ह-स्ट्रीम करण्यात येईल. Realme 9i 5G वैशिष्ट्यांबद्दल माहिती जाणून घ्या


Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन


MediaTek डायमेंशन 810 5G प्रोसेसर Realme 9i 5G मध्ये दिला जाईल, जो एंट्री-लेव्हल 5G फोनसाठी अगदी सामान्य झाला आहे. Realme 9i 5G मध्ये डायमेंशन 810 चिपसेट सपोर्ट केला जाऊ शकतो. कंपनीने याआधीही Dimensity 810 चिपसेट वापरला आहे. कंपनीने असेही सांगितले आहे की Realme 9i 5G मध्ये सर्वोत्तम डिझाइन, मोठी बॅटरी आणि AI ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल.


Realme 9i 5G चे इतर स्पेसिफिकेशन्स अजून अधिकृतपणे समोर आलेले नाहीत. असा अंदाज आहे की, Realme येत्या काही दिवसात फोनबद्दल एक किंवा दोन वैशिष्ट्य प्रकट करू शकते. Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर Realme 9i 5G च्या फिचर्समध्ये आढळू शकतो, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुलएचडी एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.


या फिचर्सची शक्यता


Realme 9i 5G मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे Realme 9i चे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याचा पर्याय देखील आहे. Realme 9i 5G फोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा असणे अपेक्षित आहे.