Upcoming Gaming Smartphones: जर तुम्ही नवीन आणि गेमिंग स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात ओप्पो आणि रिअयमी कंपनीचे गेमिंग स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये प्रीमियम आणि बजेट फ्रेंडली असे दोन्ही स्मार्टफोन असतील. भारतात गेमिंग स्मार्टफोनला अधिक पसंती दर्शवली जाते. 


रिअलमी नार्जो 50:  येत्या 24 फेब्रुवारी रोजी रिलमी कंपनीचा रिअलमी नार्जो 50 लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G96 गेमिंग प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रिअलमी नार्जो 50 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि पंच-होल डिस्प्ले डिझाइनचा समावेश केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये 4 हजार 800 एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश केला जाऊ शकतो. 


 iQOO 9: भारतात  iQOO 9 सीरीज 23 फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. हे फ्लिपकार्टवर लिस्टिंग करण्यात आलंय. हा स्मार्टफोन अवघ्या 6 मिनिटात 50 टक्के चार्ज होईल, असा कंपनीनी दावा केला. चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री केली जात आहे. चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या डिव्हाईसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. यात अल्ट्रा-फास्ट 120W फास्ट चार्जिंगसह 4700mAh बॅटरी आहे.


ओप्पो फाईंड एक्स 5: ओप्पोचा कंपनीचा नवा गेमिंग स्मार्टफोन येत्या 24 फेब्रुवारीला लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन 2 व्हेरिअंटमध्ये लॉन्च केलं जाऊ शकतं. माहितीनुसार, प्रो व्हर्जनमध्ये 6.7-इंचाचा क्वाड-एचडी+ एमोलेड डिस्प्ले असू शकतो, तर स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4 हजार 800 क्षमता असलेली बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha