मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या संगणकातील डेटा पुन्हा देण्यासाठी 600 डॉलर म्हणजे सुमारे 42 हजार रुपयांची मागणी केली जात आहे. या व्हायरसमुळे सुमारे 15 हजारहून अधिक प्रकारचे दाखले, ग्रामपंचायतींची कागदपत्र व्हायरसमुळे गेली आहेत.
संगणकाच्या स्क्रीनवर 600 डॉलर येत्या 22 मे पर्यंत भरण्याचा संदेश येत आहे. याबाबत ग्रामसेवकांना विचारले असता, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत लेखी कल्पना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचा संगणक या व्हयरसमुळे पूर्णपणे निकामी झाला असून, या ग्रामपंचायतीत येणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. जन्म-मृत्यूचे दाखले, घरपत्रक उतारा तसेच विविध प्रकारचे दाखले व नोंदी व ग्रामपंचातीचे ग्रामसभेचे नोंदी अशा प्रकारचा सर्व डेटा या व्हयरसमुळे गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
रॅनसमवेअरपासून बचाव कसा कराल?
- तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका
- ई-मेल करणारा व्यक्ती ओळखीचा आहे, मात्र ई-मेलचा विषय दररोजपेक्षा वेगळा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता, विस्कळीत असेल तरीही तो ई-मेल ओपन करु नये.
- जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रेडिफमेलवर तुमचे वैयक्तीक मेल ओपन करणं टाळावं.
- पेन ड्राईव्ह, पर्सनल पेन ड्राईव्ह किंवा कंपनीच्या एक्स्टर्नल हार्ड डिस्कचा वापर टाळावा.
- ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करताना सावधानता बाळगा
- फेसबुक, लिंकडेन आणि ट्विटरचा वापर कमीत कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये.
- तुमची सिस्टम हॅक झाल्याचा संशय आला, किंवा काही एरर मेसेज आल्यास तातडीने आयटी टीमशी संपर्क साधा