नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भारतीय रेल्वेचं ‘रेल सारथी’ अॅप लाँच करण्यात आलं. रेल्वेसंबंधी सर्व सुविधा प्रवाशांना आता एकत्रितपणे मिळणार आहेत. प्रवाशांच्या सुविधा आणि तक्रारींसाठी हे अॅप महत्वाचं ठरेल, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
सारथी अॅपचा फायदा काय?
या अॅपद्वारे तुम्ही आता तिकीट बूकिंगपासून ते कॅटरिंग आणि तक्रारींपर्यंत सर्व सेवांचा लाभ एकाच क्लिकवर घेऊ शकता.
तिकीट, ई-कॅटरिंग, कुली बूकिंग, विश्रामगृह आरक्षण, व्हील चेअर बूकिंग, ऑन बोर्ड क्लीन किंवा क्लीन माय कोच, रिअल टाईम लोकेशन, हॉटेल बूकिंग, टॅक्सी बूकिंग, विमान तिकीट बूकिंग, तक्रार, सल्ला, 139 चौकशी, 138 तक्रार आणि 183 सुरक्षा या सर्व सुविधा तुम्हाला एकाच अॅपमध्ये मिळतील.
रेल्वेचे सर्व अॅप आणि वेबसाईट यांचं एकत्रिकरण करुन इंटिग्रेटेड अॅप बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. शिवाय ऑनलाईन सुविधा मिळाल्याने शारीरिक धावपळही कमी होण्यास मदत होईल.
या अॅपद्वारे तुम्ही संकटाच्या वेळी रेल्वे पोलिसांनाही बोलावू शकता. रेल्वेने या अॅपच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या अॅपची चाचणी सुरु होती. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच 14 जुलैपासून प्रवाशांसाठी हे अॅप उपलब्ध झालं आहे.
रेल्वेच्या सर्व सुविधा एका क्लिकवर, 'रेल सारथी' अॅप लाँच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2017 12:15 PM (IST)
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भारतीय रेल्वेचं ‘रेल सारथी’ अॅप लाँच करण्यात आलं. रेल्वेसंबंधी सर्व सुविधा प्रवाशांना आता एकत्रितपणे मिळणार आहेत. प्रवाशांच्या सुविधा आणि तक्रारींसाठी हे अॅप महत्वाचं ठरेल, असं सुरेश प्रभू यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -