रिलायन्स जिओकडून या गेमचा आपल्या प्ले स्टोअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे. बुधवार म्हणजेच उद्यापासून या गेमचं ऑफिशिअल व्हर्जन युझर्सना डाऊनलोड करता येणार आहे.
रिलायन्स डिजिटलच्या काही स्टोअर्समध्ये पोकेशॉप आणि जिम उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. पोकेशॉप हे एक व्हर्च्युअल दुकान असून यामध्ये पोकेमॉन पकडण्यासाठी आवश्यक वस्तू मिळतात. तर जिम देखील व्हर्च्युअल असून यामध्ये पोकेवॉरसाठी तुमच्या पोकेमॉनला ट्रेनिंग देता येईल.
पोकेमॉन गो गेम यावर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली. भारतासह जगभरातील स्मार्टफोन युझर्सना या गेमने वेड लावलं आहे. ही गेम खेळताना अनेकांनी आपला प्राण गमावला असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.
संबंधित बातम्या :