इंदूर (मध्य प्रदेश): जीवघेण्या ब्लू व्हेल गेमची दहशत आता पालकांसाठी प्रचंड चिंतेची ठरत आहे. कारण या ब्यू व्हेल गेममुळे इंदूरमधल्या आणखी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी जाता जाता वाचला.

सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने ब्लू व्हेल गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी, शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या मित्रांनी त्याला पकडून शिक्षकांच्या ताब्यात दिलं.

ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती

शिक्षकांनी विचारणा केली असता तो ब्लू व्हेल गेमच्या पंचवीसाव्या स्टेजला असल्याची माहिती समोर आली.

काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका मुलाने या गेममुळे आत्महत्या केली होती. तर सोलापूरहून एक मुलगा याच गेममुळे पुण्यात येऊन पोहोचला होता.

त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेवण्याची गरज आहे.

काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये एक ‘मास्टर’  मिळतो मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणं, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे अशा प्रकारचे टास्क मिळाल्यामुळं खेळणारे नैराश्याच्या गर्तेत जातात अशा प्रकारे मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाचा शेवटचा टप्पा म्हणजे प्लेअरला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं आणि स्वतःची हिंमत सिद्ध करण्यासाठी अनेक प्लेअर आत्महत्या करतात.

संबंधित बातम्या


ब्ल्यू व्हेल गेमच्या 22 वर्षीय मास्टरमाईंडची धक्कादायक माहिती


‘ब्लू व्हेल’ गेमच्या नादापायी मुंबईतील 14 वर्षीय मुलाची आत्महत्या


जीवघेण्या ‘ब्लू व्हेल’ गेममुळे 130 मुलांची आत्महत्या?


ब्लू व्हेल गेम विधानसभेत, अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर