नवी दिल्लीः रिलायन्स जिओ लाँच होण्याच्या अगोदर एअरटेलने पुन्हा एकदा आकर्षक ऑफर आणली आहे. एअरटेलने डेटा पॅकमध्ये 80 टक्क्यांची कपात केली आहे, शिवाय दोन खास ऑफर आणल्या आहेत. या ऑफरनुसार कॉल दर कपातीसोबतच फ्रि कॉलिंगही असणार आहे.
रिलायन्स जिओची लाँचिंग तारीख जवळ येताच अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी एअरटेल, वोडाफोन, आयडियासारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना रिलायन्स जिओने वेड लावलं आहे. रिलायन्स स्टोअर्ससमोर जिओ सिम घेण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागत आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत जिओचे 35 मिलियन ग्राहक असतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्याः