मुंबई: मोबाइल कंपनी ओप्पो आपला नवा स्मार्टफोन F3 आज (गुरुवार) भारतात लाँच करणार आहे. मुंबईत एका इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. F3मध्ये देखील F3 प्लसप्रमाणे ड्यूल सेल्फी कॅमेरा सेटअप असणार आहे. त्यामुळे सेल्फी चाहत्यांसाठी हा फोन खास ठरु शकतो.
ओप्पो F3 मध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यामध्ये 4जीबी रॅम असू शकतो. तसेच 64 जीबी इंटरनल मेमरीही देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल असे दोन फ्रंट कॅमेरे असणार आहेत. तर 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर आधारित असेल. तर याची बॅटरी 3200 mAh असेल. दरम्यान, या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.