मुंबई : यावर्षाच्या सुरुवातीलाच A83 लाँच केल्यानंतर ओप्पोने आता या फोनचं अपग्रेडेड व्हर्जन लाँच केलं आहे. A83 या फोनची किंमत 13 हजार 990 रुपये ठेवण्यात आली होती. A83 प्रोची भारतातली किंमत 15 हजार 990 रुपये असण्याची शक्यता आहे.


या फोनचे स्पेसिफिकेशन पहिल्या व्हर्जनप्रमाणेच असतील, मात्र अपग्रेडेड व्हर्जन, रॅम आणि स्टोरेज वेगळं नक्कीच असेल. A83 प्रोमध्ये A83 च्या तुलनेत रॅम जास्त आहे. A83 प्रोमध्ये 3 GB ऐवजी 4GB रॅम, तर 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या फोनमध्ये फेशिअल अनलॉक फीचर देण्यात आलं आहे, जे वनप्लस 5T आणि आयफोन X मध्ये देण्यात आलेलं आहे.

A83 प्रोच फीचर्स

5.7 इंच आकाराची स्क्रीन

2.5GHz मीडियाटेक प्रोसेसर

4GB रॅम, 64 GB स्टोरेज

13 मेगापिक्सेल रिअर, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

फेशिअल अनलॉक