Oppo A77 4G Launch: Oppo ने आपला नवीन फोन Oppo A77 4G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Oppo ने या नवीन A-सिरीज स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 6.56-इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50 एमपीचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने यात 5000mAh बॅटरी दिली आहे. Oppo A77 4G फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Oppo A77 4G चे स्पेसिफिकेशन
- Oppo A77 4G Android 12 आधारित ColorOS 12.1 वर काम करतो.
- Oppo A77 4G फोनमध्ये 6.56-इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
- Oppo A77 4G मध्ये Octa core MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- Oppo A77 4G फोनमध्ये 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येते.
- Oppo A77 4G फोनमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रा-लिनियर स्टीरिओ स्पीकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
- Oppo A77 4G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. जो 50 MP प्राथमिक सेन्सर आणि 2 MP डेप्थ सेन्सरसह येतो. फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे.
- Oppo A77 4G फोन 5000mAh बॅटरी आणि 33W सुपर-वूक फास्ट चार्जरला सपोर्ट करतो.
- कनेक्टिव्हिटीसाठी, Oppo A77 4G फोन USB Type-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, 4G VoLTE, WiFi आणि ब्लूटूथला सपोर्ट करतो.
किंमत
Oppo A77 4G फोन 64 GB स्टोरेजसह 4 GB रॅम याच स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. ज्याची किंमत 15,499 रुपये आहे. Oppo A77 4G स्काय ब्लू आणि सनसेट ऑरेंज कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइट आणि ऑफलाइन मार्केटमधून खरेदी करता येईल. ICICI बँकेच्या कार्डवरून फोन घेतल्यावर 10 टक्के कॅशबॅकही दिला जात आहे.