OnePlus TV लवकरच बाजारात येणार, कंपनीकडून अधिकृत घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2019 11:15 PM (IST)
वनप्लसचा हा टीव्ही नेमका कधी लाँच केला जाणार? नेमक्या कोणत्या साईजमध्ये हा टीव्ही असणार? याची किंमत किती असेल? याबाबत बरेच अंदाज सध्या लावले जात आहेत.
oneplus-tv
प्रिमिअम श्रेणीतील स्मार्टफोनसाठी लोकप्रिय असलेल्या OnePlus या कंपनीचा स्मार्ट टीव्ही आता लवकरच बाजारात येणार आहे. स्मार्टफोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आता टेलिव्हिजन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज वनप्लसकडून या नव्या प्रॉडक्टचे नाव आणि लोगो प्रदर्शित करण्यात आले आहेत. OnePlus TV असे या स्मार्ट टीव्हीचं नाव आहे. वनप्लस टीव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून बोललं जात होतं. मात्र आज वनप्लस कंपनीच्या टीव्हीबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. 'द वनप्लस टीव्ही' असं या टीव्हीचं नाव असून त्याचा लोगो देखील आज प्रदर्शित करण्यात आला आहे. वनप्लसचा पहिला टीव्ही याच वर्षी लाँच केला जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. यावर्षी मे महिन्यात वनप्लसकडून वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 असे दोन स्मार्टफोन बाजारात आणण्यात आले आहेत. याच लाँचिंगवेळी वनप्लसकडून टीव्हीबाबत देखील घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. वनप्लसचा हा टीव्ही नेमका कधी लाँच केला जाणार? नेमक्या कोणत्या साईजमध्ये हा टीव्ही असणार? याची किंमत किती असेल? याबाबत बरेच अंदाज सध्या लावले जात आहेत.