OnePlus 10T 5G Launch : OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 10T 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. आज (6 ऑगस्ट 2022) या स्मार्टफोनची पहिली विक्री आहे. OnePlus 10T आजपासून Amazon आणि कंपनीच्या साइटवरून खरेदी करता येईल. हा फोन भारतीय बाजारात Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे.


फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येतो. फोनमध्ये 50 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय यात 150W सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टही देण्यात आला आहे. OnePlus 10T 5G 16 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स... 


OnePlus 10T चे Specifications



  • OnePlus 10T 5G अॅन्ड्रॉइड 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर काम करतो.

  • OnePlus 10T फोनमध्ये 6.7-इंचाचा HD Plus AMOLED डिस्प्ले आहे, जो 1080x2412 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

  • OnePlus 10T फोनची ब्राइटनेस 950 nits आणि डिस्प्लेवर 2.5D वक्र गोरिला ग्लास 5 चे संरक्षण आहे. फोन HDR10+ सपोर्टसह येतो. 

  • OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह, 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज 16 GB पर्यंत LPDDR5 रॅमसह प्रदान केले आहे.

  • OnePlus 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 MP Sony IMX766 सेन्सर आहे. तसेच, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि Nightscape 2.0 देखील सपोर्ट मिळणार आहे.

  • दुसरी लेन्स 8 MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेन्स 2 MP GC02M1 मॅक्रो सेन्सर आहे. 

  • सेल्फीसाठी OnePlus 10T फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL S5K3P9 सेंसर देण्यात आला आहे. 

  • OnePlus 10T मध्ये 4800mAh ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. जी 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरीबाबत कंपनीनं दावा केला आहे की, ती केवळ 19 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

  • OnePlus 10T 5G मध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.2, GPS/A-GPS, NFC आणि USB टाईप-C पोर्टची सुविधा देण्यात आली आहे. 

  • OnePlus 10T फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.  


OnePlus 10T 5G ची किंमत 


OnePlus 10T 5G फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 49,999 रुपये, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 54,999 रुपये आणि 16 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 55,999 रुपये आहे. OnePlus 10T5G फोन दोन कलर ऑप्शन मूल ब्लॅक आणि जेड ब्लॅकमध्ये मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दरम्यान, हा फोन 6 ऑगस्ट म्हणजेच, आजपासून ऑनलाईन-ऑफलाईन स्टोअर आणि अॅमेझॉन इंडियावरुन खरेदी केलं जाऊ शकतं.