नवी दिल्ली : वनप्लसने 5T हा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लाँच केला आहे. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आला. विशेष म्हणजे या फोनची किंमत वनप्लस 5 एवढीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नवीन फोन घेणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.

6.1 इंच आकाराची स्क्रीन हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. 8GB आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 32 हजार 999 रुपये, तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

हे दोन्ही फोन सध्या केवळ ब्लॅक कलरमध्येच उपलब्ध असतील. वनप्लसच्या या फोनची पहिली विक्री 21 नोव्हेंबरला होईल, जी केवळ अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठीच असेल. तर या फोनची खुली विक्री 28 नोव्हेंबरपासून सुरु होईल.

वनप्लसच्या या नव्या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सेल, तर सेकंडरी कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे. शिवाय ड्युअल एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे. लो लाईटमध्येही चांगली फोटोग्राफी करता येईल, असा कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे.

वनप्लस 5T चे फीचर्स :

  • अँड्रॉईड 7.1.1 नॉगट

  • 6.1 इंच आकाराची स्क्रीन

  • 2.45GHz कॉड कोअर प्रोसेसर

  • 6GB/64GB स्टोरेज आणि 8GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट

  • 20 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

  • 3300mAh क्षमतेची बॅटरी