Ola CEO  Bhavish Aggarwal : ओला कंपनीनं त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये  moveOS 2.0 हे नवे ऑपरेटिंग सिस्टिम दिले आहे. या ऑपरेटिंग सिस्टिंमुळे आता ग्राहकांनी स्कूटरमध्ये म्युझिक फिचर मिळेल. म्हणजेच या स्कूटरवर प्रवास करतान आता ग्राहकांचे मनोरंजन देखील होणार आहे. ओला कंपनीचे को- फाऊंडर भाविश अग्रवाल( Bhavish Aggarwal) यांनी नुकतेच या नव्या फिचरचे टेस्टिंग एका खास पद्धतीनं केलं.


ओला कंपनीच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग विभागाचे प्रमुख स्लोकार्थ डॅश यांच्यासोबत हार्डी संधूच्या बिजली बिजली या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ नुकताच भाविश अग्रवाल यांनी शेअर केला. या व्हिडीओमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर देखील दिसत आहे. भाविश अग्रवाल यांनी हा डान्स व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'MoveOS 2 या म्युझिक फिचरचं फाईनल टेस्टिंग करत आहे.'






अनेक नेटकऱ्यांनी भाविश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ' MoveOS 2.0 सारखे अमेझिंग म्ह्यूव्ज'





तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करून या लाँच डेटबाबत विचारलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :