नवी दिल्ली : नूबिया कंपनीचे दोन जबरदस्त स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 'नूबिया Z 11' आणि 'नूबिया N 1' हे दोन स्मार्टफोन सोमवार म्हणजे आजपासून अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील.
'नूबिया Z 11' यामध्ये दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, 6.0 अँड्रॉईड सिस्टीम, 820 स्नॅपड्रॅगन क्वालकॉम प्रोसेसर, 6 GB रॅम, सोनी आयमॅक्स 298 सेन्सरचा 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 64 GB स्टोरेज, 3000mAH क्षमतेची बॅटरी असे फीचर्स देण्यात आले आहेत. तर 29 हजार 999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.
'नूबिया N 1'मध्येही चांगले फीचर्स दिले असून या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. यामध्ये 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, 6.0 अँड्रॉईड सिस्टीम, 3 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज, 5000mAH क्षमतेची बॅटरी, 13 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.