मुंबई : ट्विटरने आयओएस प्लॅटफॉर्मसाठीही मिडनाईट मोड फीचर लॉन्च केलं आहे. हे फीचर सर्वात पहिलं ट्विटर अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिलं होतं. मात्र, आयओएस अॅपलाही हे फीचर सपोर्ट व्हावं, यासाठी ट्विटरकडून प्रयत्न सुरु होते.

 

नाईट मोडमध्ये प्रामुख्याने अॅपची थीम बदलते. नेहमीच्या मोडपेक्षा जास्त गडद रंगाची थीम (मिड नाईट ब्लू) होते. त्यामुळे लाईट्सचा प्रकाश असतानाही, यूझरना अॅप वापरण्यास अडचण येत नाही. आयओएस डिव्हाईसमध्ये नाईट मोड वापरण्यासाठी तुम्हाला ट्विटर अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनवरील सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन अॅक्टिव्हेट करावं लागेल.

 

ट्विटरने सोमवारी एका ट्वीटद्वारे माहिती दिली की, मिडनाईट मोड फीचर आयओएस प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. नाईट मोड आयओएस अॅपचं व्हर्जन 6.60 मध्ये उपलब्ध असेल.

 

अँड्रॉईडसारखंच आयओएसमध्येही आपोआप हे फीचर अॅक्टिव्हेट होत नाही. अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला अॅक्टिव्हेट करावं लागतं.