मुंबई : आपल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं, कोणत्याही प्रकारची माहिती गुगलनंतर कुठे मिळत असेल तर ती आहे कोरा वेबसाईट. गुगलपेक्षा एखाद्या गोष्टीबद्दल अधिक विस्तृतपणे माहिती या कोरावर आजतागायत फक्त इंग्रजीमध्ये मिळायची. मात्र आता कोरा वेबसाईट मराठीत आल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं, माहिती आता मराठीत मिळणार आहे. शिवाय एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल ते सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर देऊ शकणार आहात.
कोरा वेबसाईट इंग्रजीमध्ये 2009 साली माहितीची देवाणघेवाण करता यासाठी सुरु करण्यात आली. त्यानंतर दहा वर्षांनंतर ही वेबसाईट आता मराठीत सुरु करण्यात आली आहे.
कोरा वेबसाईट आता एकूण 17 भाषेत असणार आहे. यामध्ये मराठी भाषेत असल्याने मराठी भाषिक व्यक्तीसाठी माहितीचा खजिना मराठीत उघडला आहे. या वेबसाईटवर तुम्ही कोणतेही प्रश्न विचारु शकता. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याविष्यातील तज्ज्ञ व्यक्तीकडून मिळू शकतं. शिवाय तुम्ही सुद्धा, तुम्हाला माहित असलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन इतरांना मदत करु शकता.
जागतिक स्तरावर ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, हे कोरा वेबसाईटचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे विज्ञान, गणित, साहित्य, तंत्रज्ञान, प्रवास, खाद्यविषयक कोणत्याही माहितीसाठी आता मराठी कोरा उपयोगी पडणार आहे.
या मराठी कोरा वेबसाईटवर तुम्हाला मराठी टाइपिंग करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कम्प्युटर, लॅपटॉपवरही टायपिंग करु शकता किंवा मोबाईलवर कोरा अॅप गुगल प्लेवरुन डाऊनलोड करुन मराठी भाषा निवडून मोबाईलवर मराठी टायपिंग करु शकता.
लेखक, ब्लॉगर आपल्याला एका विषयाची सखोल माहिती असल्यास कोरावर देऊ शकतात. जेणेकरुन त्यांचे ब्लॉग, माहिती, लेख याला आणखी प्रसिद्धी मिळू शकते आणि इतरांना ती माहिती मिळू शकते. त्यामुळे कोणत्याही अचूक माहितीसाठी, उत्तरासाठी कोरा मराठी वेबसाईट ही उपयोगी ठरणार आहे.
कोरा वेबसाईटवर आता मराठीत उत्तरं आणि माहिती मिळवा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2019 04:38 PM (IST)
कोरा वेबसाईट इंग्रजीमध्ये 2009 साली माहितीची देवाणघेवाण करता यासाठी सुरु करण्यात आली. त्यानंतर दहा वर्षांनंतर ही वेबसाईट आता मराठीत सुरु करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -