Nothing Phone (1) : नथिंग कंपनीनं आपला पहिला स्मार्टफोन अखेरिस लॉन्च केला आहे. या वर्षातील बहुचर्चित स्मार्टफोन काल (मंगळवारी) संध्याकाळी लंडनमधील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आला. Nothing च्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Series 5G चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन आकर्षक ट्रान्सपरन्ट डिझाइनसह लॉन्च करण्यात आला असून हेच या फोनचं वैशिष्ट्य आहे. या स्मार्टफोनच्या ट्रान्सपरन्ट लूकमुळेच तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. Nothing Phone (1) नं आपला पहिला वहिला स्मार्टफोन मिड-रेंजमध्ये लॉन्च केला आहे. नथिंग (1) भारत, युरोप आणि काही आशियाई बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल. जाणून घेऊयात नथिंग फोन (1) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत... 


Nothing Phone (1) ची भारतीय बाजारपेठीतील किंमत 


नथिंग फोन (1) तीन कॉन्फिगरेशनमध्ये मिळणार आहे. 8GB+128GB ची किंमत 32,999 रुपये, 8GB+256GB मॉडलची किंमत 35,999 रुपये आणि टॉप लाइनच्या 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 38,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. नथिंग फोन (1) पास असणाऱ्यांनाच हा फोन प्री-ऑर्डर करता येणार आहे. तर बाजारात या स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून सुरु होणार आहे. 



भारतात Nothing Phone (1) व्हेरियंटची किंमत



  • 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 32,999 रुपये

  • 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 35,999 रुपये

  • 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 38,999 रुपये


Nothing Phone (1) लॉन्च ऑफर


लॉन्च ऑफर्ससाठी, ग्राहकांना फ्लिपकार्टवर एचडीएफसी बँक कार्डसोबत 2000 रुपयांची तत्काळ सूट मिळणार आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत ज्या ग्राहकांकडे प्री-ऑर्डर पास आहे, ते 1,499 रुपयांमध्ये 45W चार्जर मिळेल. तर ईयर (1) 5,999 रुपयांमध्ये मिळेल


स्पेसिफिकेशन्स 


नथिंग फोन (1) 6.55-इंच OLED डिस्प्लेसोबत 120Hz स्क्रिन रिफ्रेश रेट आणि फुल HD+ रिझोल्यूशनसह येतो. फोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G + प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिलं गेलं आहे. फोन ग्लिफ इंटरफेससोबत एक ट्रान्सपरंट बॅकमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनचं विशेष आकर्षण म्हणजे, त्याचा ट्रान्सपरन्ट लूक. फोनच्या मागील बाजूस एलईडी लाईट्सचा सेट आहे. फोनला बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूंनी ग्लोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. नथिंग फोन (1) मध्ये 50MP (Sony IMX766) प्रायमरी स्नॅपर आणि 50MP (Samsung JN1) अल्ट्रा-वाइड अँगल लेंसच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16MP चा Sony IMX471 सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे.