नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 लवकरच ग्राहकांच्या हातात
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2017 03:55 PM (IST)
मुंबई: नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 पुढील महिन्यापासून ग्राहकांना मिळणार आहे. औपचारिकपणे नोकिया 3310 फोनच्या शिपिंगचं घोषणा केली आहे. नोकिया 3310चं शिपिंग सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोकिया फोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलकडून माहिती देण्यात आली आहे की, भारतात पुढील महिन्यापासून नोकियाचा फोन मिळणं सुरु होईल. नोकियानं 3310 आणि दुसरे स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला एमसीडब्ल्यूमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले होते. नोकिया 3310 फोनचे खास फीचर नोकिया 3310 (2017) पहिल्या नोकिया हॅण्डसेटपेक्षा बराच हलका आहे. यामध्ये 2.4 QGVP डिस्प्ले कर्व्ड स्क्रिन आहे. तसेच यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेराही आहे. याची बॅटरी 1200 mAh आहे. तसेच यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये हेडफोन जॅक, एफएम रेडिओ, Mp3 प्लेअरसारखे कनेक्टिंग ऑप्शन आहे. तसेच यामध्ये यूजर्सचा आवडीचा SNAKE GAME देखील आहे. तसेच यामध्ये आता कलर स्क्रिनही देण्यात आली आहे.