मुंबई : दुरसंचार जगतात एक काळ गाजवलेल्या फिनलँडच्या नोकिया कंपनीने दोन नव्या स्मार्टफोनसह कमबॅकची तयारी केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार नोकिया यावर्षी दोन नवीन स्मार्टफोनसह पुन्हा एकदा बाजारात कमबॅक करत आहे. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नूगा ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असतील.


 
द इंक्वायरर या नियतकालिकाच्या वृत्तानुसार या दोन्ही स्मार्टफोनची नावं अजून निश्चित झालेली नाहीत. ही दोन्ही मॉडेल्स वॉटरप्रुफ असणार आहेत. हे स्मार्टफोन 5.2 आणि 5.5 क्यूएचडी डिस्प्ले, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि अत्याधुनिक कॅमेरा अशा सुविधांनी युक्त असतील.

 

 

दोन्ही स्मार्टफोन स्प्लीट स्क्रीन मोड आणि अत्याधुनिक सुविधांनी भरलेले असतील तसेच या स्मार्टफोनना 3डी टच असण्याची शक्यता आहे.
बाजारात आपले स्थान टिकवण्यासाठी धडपड करत असलेल्या नोकिया कंपनीने फिनलँडमधील एचएमडी या कंपनीला मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवण्याचे परवाने दिले आहेत.

 
दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकियाच्या फोन व्यवसायाला 7.2 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले होते. मायक्रोसॉफ्टने मागच्या वर्षभरात 7800 लोकांना कमी केले असून 7.6 अब्ज डॉलर खर्च केले आहेत.

 

 

मायक्रोसॉफ्ट लुमिया आणि विंडोज फोनच्या अपयशानंतर वाजारातील त्याचे मुल्य बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.