मोस्ट अवेटेड Nokia 8 स्मार्टफोन लाँच
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2017 10:54 AM (IST)
मोस्ट अवेटेड नोकिया 8 स्मार्टफोन नुकताच लंडनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
NEXT PREV
मुंबई : HMD ग्लोबलनं काल लंडनमध्ये मोस्ट अवेटेड नोकिया 8 अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये Carl Zeiss ब्रँडचा ड्युल कॅमेराही आहे. हा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 599 युरो जवळजवळ 45,000 रुपये आहे. भारतात हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिनापर्यंत येण्याची शक्यता आहे. नोकिया 8 स्मार्टफोनचे खास फीचर : 5.3 इंच स्क्रीन, 2K एलसीडी डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल मेमरी अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टम 13 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा असून यामध्ये बोथीज मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे फ्रंट आणि रिअर कॅमेरानं एकाच वेळी फोटो काढता येणार आहे. यामध्ये 360 डिग्री व्हर्च्युअल कॅमेराही आहे. याची बॅटरी 3090 mAh आहे. तसेच यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टिव्ह फीचरही आहे.