मुंबई: नोकिया 13 जूनला आपले 3 नवे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. नोकियाच्या स्मार्टफोनचे हक्क घेतलेली कंपनी HMD ग्लोबल भारतात नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 लाँच करणार आहे.

13 जूनला होणाऱ्या या इव्हेंटसाठी HMD ग्लोबलनं मीडिया इनव्हाईट पाठवणं सुरु केलं आहे. नोकिया ब्रँडच्या स्मार्टफोन विक्रीचे हक्क फिनलँडची कंपनी HMD ग्लोबलकडे आहेत.


नोकिया 3: हा स्मार्टफोन  7.0 नॉगट ओएसवर आधारित आहे. नोकिया 3 आणि नोकिया 5 यूजर्सला गुगल फोटो अॅप आणि अनलिमिटेड क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. यामध्ये 1.3 Ghz क्वॉड कोअर मीडिया टेक प्रोसेसर असून 2 जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसंच यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. जे 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं.

नोकिया 3 मध्ये रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. तर 2650 mAh बॅटरीही देण्यात आली आहे. यामध्ये 4G LTE कनेक्टिव्हीटीही आहे.
नोकिया 5 : हा स्मार्टफोन 7.1 नॉगट ओएसवर आधारित आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेंसर होम बटण देण्यात आलं आहे. नोकिया 3 प्रमाणेच या स्मार्टफोनला मेटल बॉडी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम आणि सिंगल सिम असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

नोकिया 5 मध्ये 5.2 इंच 720x1280 रेझ्युलेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल देण्यात आला आहे तर रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल देण्यात आला आहे. यामध्ये 3000 mAh बॅटरी आहे.

नोकिया 6 : हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगटवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे. ड्यूल सिम सपोर्ट आहे.

यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट असून यात 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. तर यात 64 जीबी इंटरनल मेमरीही असणार आहे. एसडी कार्डनं याची मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्येही फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. यामध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.