मुंबई : स्मार्टफोन आणि आयफोनचं हे युग आहे. तेही हाय क्वालिटी डिस्प्ले, चार-पाच-सहा जीबीचे रॅम, शंभर जीबीपर्यंतची इंटरनल मेमरी वगैरे. एकंदरीतच बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवे बदल फोनमध्ये दिवसागणिक होत आहेत. मात्र असे असतानाही जुन्या गोष्टींबद्दल एक वेगळीच आपुलकी असते. जुनं ते सोनं म्हणतात तसं. अशांपैकीच एक म्हणजे 'नोकिया 3310'.
नोकियाचा '3310' फोन नव्याने बाजारात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासूनच या फोनबद्दलची उत्सुकता ग्राहकांमध्ये प्रचंड असल्याचे दिसून येते आहे. कारण या फोनशी एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे. आजचे चकाकते आणि हाय क्वालिटी वगैरे स्मार्टफोन सहा-सात महिन्यात जुने होतात आणि अॅडव्हान्स मॉडेल बाजारात येतात. मात्र काही फोन हे क्लासिक असतात. 'नोकिया 3310' अशाच फोनपैकी एक असून, त्याच्या लॉन्चिंगची वाट पाहणारा एक मोठा वर्ग होता. अखेर 'नोकिया 3310' फोन लॉन्च झाला आहे.
'एचएमडी' या नोकिया ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने 'नोकिया 3310' फोनचं मोस्ट अवेटेड थ्रीजी मॉडेल बाजारात आणलं आहे. सध्या ऑस्ट्रेलियन बाजारात आणलेलं हे मॉडेल, लवकरच जगभरातील बाजारात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून विक्रीस सरुवात होणार असून, ऑस्ट्रेलियात या फोनची किंमत 86.95 ऑस्ट्रेलियन डॉलर (4 हजार 600 रुपये) एवढी आहे.
या फोनचं यंदा मे महिन्यात भारतात लॉन्चिंग करण्यात आलं होतं. मात्र ते थ्रीजी मॉडेल नव्हतं. भारतात लॉन्च केलेल्या फोनची किंमत 3 हजार 310 रुपये आहे. जुन्या फोनच्या तुलनेत नवा फोन अधिक हलका आण कलरफुल डिस्प्ले असणारा आहे. असे काही बेसिक फरक नव्या फोनमध्ये करण्यात आले आहेत. आणि आता तर नव्या तंत्रज्ञानायुक्त म्हणजे थ्रीजीमध्ये हे मॉडेल येत आहे. त्यामुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे.
भारतात लॉन्च झालेल्या 'नोकिया 3310'चे फीचर्स :
- 2.4 QGVP डिस्प्ले कव्हर्ड स्क्रीन
- 1200mAh रिमोव्हेबल बॅटरी
- 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 16 एमबी मेमरीचा मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट
- यूएसबी पोर्ट
- एफएम, हेडफोन जॅक, एपीथ्री प्लेयर कनेक्टिंगचे पर्याय
'नोकिया 3310' फोनचं 3G मॉडेल लॉन्च
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 07:58 AM (IST)
आजचे चकाकते आणि हाय क्वालिटी वगैरे स्मार्टफोन सहा-सात महिन्यात जुने होतात आणि अॅडव्हान्स मॉडेल बाजारात येतात. मात्र काही फोन हे क्लासिक असतात. 'नोकिया 3310' अशाच फोनपैकी एक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -