मुंबई: नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 भारतात लॉन्च करण्यात आला असून, येत्या 18 मेपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे कंपनीने याची किंमत ही 3310 रुपयेच निश्चित केली आहे.


नोकियानं 3310 हा नवा फोन इतर दोन स्मार्टफोनसोबत फेब्रुवारीमध्ये एमसीडब्ल्यूमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये लाँच केला होता. त्यावेळी कंपनीनं लवकरच हा ग्राहकांना उपलब्ध असेल असंही कंपनीनं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार 18 मेपासून हा भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.

भारतात या फोनचे पिवळा, लाल, निळा आणि राखाडी (ग्रे) रंगातील वॅरिएंट उपलब्ध असतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

नोकिया 3310 फोनचे खास फीचर

नोकिया 3310 (2017) पहिल्या नोकिया हॅण्डसेटपेक्षा बराच हलका आहे. यामध्ये 2.4 QGVP डिस्प्ले कर्व्ड स्क्रिन आहे. तसेच यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेराही आहे.

याची बॅटरी 1200 mAh आहे. तसेच यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आलं आहे. तसेच यामध्ये हेडफोन जॅक, एफएम रेडिओ, Mp3 प्लेअरसारखे कनेक्टिंग ऑप्शन आहे.

तसेच यामध्ये यूजर्सचा आवडीचा SNAKE GAME देखील आहे. तसेच यामध्ये आता कलर स्क्रिनही देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

नोकियाचा मोस्ट अवेटेड फोन 3310 लवकरच ग्राहकांच्या हातात


'नोकिया 3310' च्या या मॉडेलची किंमत तब्बल 1,13,200 रुपये!


नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच


नोकियाचा धमाका ! ‘नोकिया 3310’ रि-लॉन्च, सोबत 2 नवे स्मार्टफोन बाजारात


नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात