मुंबई: नोकियानं 3310 (2017) भारतात नुकताच लाँच केला आहे. या नव्या फोनची किंमतही 3310 रुपये आहे. पण याच दरम्यान, एक खास गोष्ट समोर आली आहे.

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, अमेझॉनवर नोकिया 3310 सारखाच हुबेहूब दिसणारा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. ज्याची किंमत फक्त 799 रुपये आहे.



या नव्या स्मार्टफोनचं नाव डारागो 3310 आहे. याचा लूक पूर्णपणे नोकिया 3310 सारखाच आहे. डारागो 3310 हा नेव्ही ब्ल्यू, निऑन रेड आणि ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ऑनलाईन वेबसाइटवर सध्या हा फोन आउट ऑफ स्टॉक आहे.

डारागो 3310 या स्मार्टफोनचे खास फीचर: 

- यामध्ये ड्यूल सिम सपोर्ट देण्यात आला आहे

- याचा डिस्प्ले 1.77 इंच असून यामध्ये 320x240 पिक्सल रेझ्युलेशन

- 1 एमबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी, तसंच एसडी कार्डच्या साह्य्यानं मेमरीही वाढवता येईल

- यामध्ये 0.3 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

- याची बॅटरी क्षमता 1050 mAh आहे

संबंधित बातम्या:

18 मेपासून नोकिया 3310 भारतीय ग्राहकांच्या भेटीला!


नव्या रंगात, नव्या ढंगात, बहुप्रतिक्षित नोकिया 3310 रिलाँच


नोकियाचा धमाका ! 'नोकिया 3310' रि-लॉन्च, सोबत 2 नवे स्मार्टफोन बाजारात


नोकिया 3310 फोनच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ उजेडात