मुंबई: फोटोप्रेमींसाठी निकॉनने आपला नवा कॅमेरा आणला आहे. निकॉन इंडियाने सोमवारी 2 लाख 54 हजार 950 रुपयांचा Nikon D850 कॅमेरा लाँच केला आहे.
हा कॅमेरा 47.5 मेगापिक्सलचा बीएसआय सीएमओएस सेंसरचा आहे. केवळ या बॉडीची किंमत 2,54,950 रुपये आहे. तर ‘एएफ-एस निकर 24-120 एमएम f/4z ईडी वीआर’ लेन्ससह याची किंमत 2 लाख 99 हजार 950 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा निकॉनचा पहिला डीएसएलआर आहे, जो बीएसआय सीएमओएस सेंसरसह उपलब्ध आहे. यामुळे फोटो आणि प्रकाश अधिक कुशलतेने टिपता येतात.
या कॅमेऱ्यात ‘एक्सपीड 5’ इमेज प्रोसेसिंग इंजिन आहे, जो 9 फ्रेम प्रति सेकंदाने शूटिंग करु शकतो.
NIKON D850 हा एक हिरो कॅमेरा आहे. कॅमेरा दुनियेत हा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. भारत आणि जगभरातील फोटोप्रेमींना हा कॅमेरा नक्कीच आवडेल असाही विश्वास कंपनीला आहे.