मुंबई: रॉबिन कंपनीनं आपला मच अवेटेड क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन Nextbit  अखेर भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रु. आहे. 30 मेपासून या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर विक्री सुरु होणार आहे. यासाठी प्री-रजिस्ट्रेशन आजपासून सुरु होणार आहे.
या स्मार्टफोनचं सगळ्यात खास फिचर म्हणजे स्मार्ट स्टोरेज. जो तुमच्या फोनमधील डेटा आपोआप क्लाउडवर स्टोअर करेल. इतकंच काय तर फोनवरील अॅपही क्लाउडवर स्टोर केले जातील. यामध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 100 जीबी क्लाउड स्टोरेज देण्यात आलं आहे.

 

जेव्हा तुमचा स्मार्टफोन चार्जर किंवा वाय-फाय नेटवर्कशी जोडला असले तेव्हा डिव्हाइस तुमचा लोकल डेटा क्लाउडवर स्टोअर करेल. त्यामुळे स्मार्टफोनमधील लोकल स्टोरेजचा तुम्हाला फायदा होईल.

 



Nextbit robin मध्ये 5.2 इंच डिस्प्ले असून याचं रेझ्युलेशन 1008x1920 पिक्सल आहे. तसेच यामध्ये क्वॉलकॉम हेक्सा-कोअर स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम आहे. 32 जीबी इनबिल्ट स्टोरेजला वाढवता देखील येतं.

 

या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरदेखील देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता  2680mAh आहे. तसंच यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. तसंच 4जी आणि 3जी, वाय-फाय आणि इतर कनेक्टिविटी फीचरचा देखील समावेश आहे.