WhatsApp वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी सातत्यानं काही अपडेट येत असतात. त्यातच आता आणखी एक अपडेट आल्याची चर्चा आहे. नव्या वर्षात हे नवं फिचर सर्वांच्याच भेटीला आलं आहे. थोडक्यात ही एक प्रायव्हसी पॉलिसी असेल. जर युजरनं ही पॉलिसी एक्सेप्ट केली नाही, तर त्यांना हे अॅप आणि थोडक्यात अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे.
काय आहे नवी प्रायव्हसी पॉलिसी ?
लवकरच WhatsApp युजर्सना नवी पॉलिसी स्वीकारावी लागणार आहे. असं न केल्यास तुम्हाला ही सेवा वापरता येणार नाही. WABetaInfo च्या माहितीनुसार व्हॉट्स अॅप 8 फेब्रुवारी 2021 ला 'टर्म्स ऑफ सर्व्हिस' अपडेट करणार आहे.
WhatsApp च्या नव्या पॉलिसीमध्ये युजर्सना एक परवाना अर्थात लायसन्स देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आमच्याकडून (WhatsApp) देण्यात येणाऱ्या सेवांचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही WhatsApp वर जी माहिती अपलोड, सबमिट, स्टोअर करता किंवा मिळवता, तिला पुन्हा वापरात आणण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल लायसन्स अर्थात परवाना देण्याचा मुद्दा मांडत ही बाब नमूद केली आहे.
WhatsApp वर पर्सनल चॅट आता लॉक करता येणार! जाणून घ्या सोप्या भाषेत
युजर्सकडे सध्या आहे 'हा' पर्याय...
सध्याच्या घडीला WhatsApp युजर्सना Not Now हा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे नको असल्यास तूर्तास ते ही पॉलिसी नाकारुही शकतात. असं केल्यासही तुमचं अॅप सुरुच राहील. या व्यतिरिक्त नव्या पॉलिसीअंतर्गत फेसबुक आणि इन्स्टाग्राम इंटिग्रेशन होणार आहे. ही बाब नवी नाही. पण, आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम इंटीग्रेशन पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे. कंपनीनंच ही बाब स्पष्ट केली आहे.
WhatsApp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट न केल्यास अकाऊंट करावं लागणार डिलीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jan 2021 01:24 PM (IST)
WhatsApp वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी सातत्यानं काही अपडेट येत असतात. त्यातच आता आणखी एक अपडेट आल्याची चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -