Motorola G42 Launch in India : Motorola लवकरच भारतात आपला नवा स्मार्टफोन Moto G42 लॉन्च करणार आहे. मोटोरोला आपला आगामी स्मार्टफोन दमदार बॅटरी आणि क्लासी कॅमेऱ्यासह लॉन्च करणार आहे. याव्यतिरिक्त Moto G42 मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट आणि फ्रंटमध्ये सेंटर पंच होल कटआउट देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. ज्यामुळे याच्या काही फिचर्सबाबत माहिती बाहेर आली आहे. लिस्टिंग आणि मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीवरुन जाणून घेऊया Moto G42 च्या लिक झालेल्या फिचर्सबाबत... 


Moto G42 चे फीचर्स



  • Moto G42 मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट आणि फ्रंटमध्ये सेंटर पंच होल कटआउट दिला जाऊ शकतो. 

  • Moto G42 एक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC दिला जाऊ शकतो. 

  • बॅटरी क्षमतेबाबत बोलायचं झालं तर Moto G42 मध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 20W TurboPower फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 

  • कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर फोनमध्ये ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि 2MP मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. 

  • फ्रंट कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं तर, Moto G42 मध्ये 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. 

  • Moto G42 ला IP52 वॉटर रेजिस्टेंस रेटिंग देण्यात आली आहे. 

  • या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. 

  • Moto G42 स्मार्टफोन दोन कलर व्हेरियंट, अटलांटिक ग्रीन आणि मेटालिक रोज या कलर्समध्ये उपलब्ध असणार आहे. 


कॅमेरा आणि बॅटरी 


Moto G42 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC सह सुसज्ज आहे आणि 20W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार्‍या 5,000mAh बॅटरीसह लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. मागील बाजूस, डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. दुसरीकडे, समोर एक 16MP सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.


महत्त्वाची वैशिष्ट्य 


इतर वैशिष्ट्यांमध्ये Dolby Atmos सपोर्ट, IP52 वॉटर रेझिस्टन्स आणि Android 12 OS आउट-ऑफ-द-बॉक्स (Android 13 वर अपग्रेडसह) समाविष्ट आहे. ब्रँड नवीन स्मार्टफोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोझ या दोन कलर व्हेरियंटमध्ये ऑफर करेल.