मुंबई: स्मार्टफोन कंपनी मोटोरोलनं काही वेळापूर्वीच मराठीतून ट्वीट करुन अनेक नेटीझन्सना बुचकळ्यात पाडलं होतं. एक दोन नव्हे तर तब्बल पाच ट्वीट मराठीतून केले होते. त्यामुळे 'मोटो'चा नेमका 'मोटो' काय? असा प्रश्न नेटीझन्सना पडला होता. मात्र, आता यामागचं गुपित अखेर उघड झालं आहे.

‘पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल! लवकरच, काहीतरी दमदार होणार आहे!’ असं ट्विट मोटोरोलानं केलं होतं.

त्यामुळे पुणे आणि मोटोरोलाचं काहीतरी संबंध आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर मोटोरोलानं याबाबत नेमकं काय ते स्पष्ट केलं आहे.


आयपीएलमध्ये पुण्याचा संघ खेळणार आहे. यामध्ये मोटोरोला 'रायझिंग पुणे' संघाच्या  स्पॉन्सर असणार आहे.

पुणे रायझिंगच्या जर्सीचं आज अनावरण करण्यात आलं. या जर्सीवर मोटोरोलोचा लोगो आहे. त्यामुळे रायझिंग पुणेचा महत्वाचा स्पॉन्सर मोटोरोला असणार आहे.  जर्सीचं अनावरण करण्यात आलं त्यावेळेसचा फोटो अपलोड मराठी ट्विटचं गुपित त्यांनी उघड केलं.

संबंधित बातम्या:

'पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल!', मोटोरोलाचं मराठीतून ट्वीट