मुंबई:लेनोव्हो आणि मोटोरोलानं आपला नवा बजेट स्मार्टफोन मोटो C भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपये आहे. हा फोन ऑफलाईन रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
1 जीबी रॅम आणि 16 जीबी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसंच यामध्ये 4G VoLTE सपोर्ट आहे.
मोटो C फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये 5 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 480x854 पिक्सल आहे. तसंच यामध्ये 1.1 GHz मीडियाटेक क्वॉडकोअर प्रोसेसर आहे. तसेच 1 जीबीरॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. तसेच एसडी कार्डच्या सहाय्यानं मेमरी वाढवता येणार आहे.
तसेच यामध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आहे. तसंच यात 2350 mAh बॅटरी आहे. पर्ल व्हाईट आणि स्ट्रे ब्लॅक कलर व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत.