मुंबई : स्मार्टफोन कंपनी लेनोव्होने गुरूवारी सेंट फ्रान्सिसकोमध्ये मोटो झेड आणि मोटो झेड फोर्स हे दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले. यासोबतच मोटोच्या मोड्स मैग्नेटिक स्नैप-ऑन रियर पॅनलचंही लाँचिंग करण्यात आलं.
मोटो झेड आणि मोटो झेड फोर्स हे दोन्ही स्मार्ट फोन मोटो मोडस सोबत येत्या सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात येणार आहे. सध्या कंपनीने दोन्ही स्मार्ट फोनची किंमत जाहीर केलेली नाही. हे दोन्ही स्मार्टफोन मोटो मेकर कस्टमायझेशन फीचरला सपोर्ट करतात.
मोटो झेड स्मार्टफोनचे खास फीचर्स:
हा सर्वात स्लिम स्मार्टफोन असून याची जाडी फक्त ५.२ एमएम आहे. फोनमध्ये ५.५ इंचाचा क्यूएलडी एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. तसेच 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. मोटो झेडचा कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे. याचा बॅटरी बॅकअपही चांगला असून तब्बल 30 तास त्याची बॅटरी काम करू शकते असा कंपनीचा दावा आहे.
मोटो झेड फोर्स स्मार्टफोनचे खास फीचर्स:
मोटो एक्स फोर्सप्रमाणे यामध्ये शॅटरशिल्ड टेक्नॉलॉजी आहे. याचा डिस्प्ले अनब्रेकेबल असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्मार्टफोनचे फिचर्स मोटो झेडप्रमाणेच आहेत, केवळ याला 3500 mAh क्षमतेची बॅटरी आहे. यामध्ये ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि लेजर ऑटोफोकस सोबत 21 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.