नवी दिल्ली : मोटोरोलाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत मोटो X4 बर्लिनमधील टेक फेस्टिव्हल IFA 2017 मध्ये लाँच करण्यात आला. विशेष म्हणजे मोटो X सीरिजचा याअगोदरचा फोन 2015 मध्ये लाँच करण्यात आला होता. हा फोन अमेझॉनच्या अॅलेक्झा व्हॉईस असिस्टंटला सपोर्ट करतो. मोटो X4 या महिन्यात युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची किंमत 25 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे. सुपर ब्लॅक आणि स्टर्लिंग ब्ल्यू या कलरमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. मोटो X4 ची विशेषता म्हणजे हा फोन 15 मिनिट चार्ज केल्यानंतर 6 तास वापरता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. भारतात हा फोन कधी लाँच केला जाईल, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मोटो X4 चे फीचर्स :
  • अँड्रॉईड नॉगट 7.1
  • सिंगल सिम स्लॉट
  • 5.2 इंच आकाराची स्क्रीन
  • 2.2GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 ऑक्टाकोअर प्रोसेसर
  • 3GB रॅम, 32GB इंटर्नल स्टोरेज
  • 12/8 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी
  • फास्ट चार्जिंग सपोर्ट