मुंबई : जर तुम्ही तेच ते स्मार्टफोनचे मॉडेल वापरून कंटाळला असाल, तर आता तुमच्यासाठी एक नवे स्मार्टफोनचे मॉडेल बाजारात आले आहे. याचा आकारच पाहूनच तुम्ही चकरावून जाल.
Monohm कंपनीने Runcible नावचा नावा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनने टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सगळ्यांना चकरावून सोडले आहे. कारण या स्मार्टफोनचा आकार गोलाकार आहे. या स्मार्टफोनचे दोन मॉडेल सध्या बाजारात उतरवण्यात आले आहेत. यातील एकाची किंमत ३९९ डॉलर (भारतीय चलनानुसार, २६००० रूपये) तर दुसऱ्या मॉडेलची किंमत ४९९ डॉलर (३३ हजार रुपये) आहे.
या स्मार्टफोनला २.५ इंचाची राउंडेड स्क्रिन असून तिची रिझॉलेशन कॉलिटी ६४० X ६४० आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१० ची चिप देण्यात आली आहे. तसेच सोबत १ जीबीची रॅमही जोडण्यात आली आहे. यामध्ये ७ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
https://vimeo.com/170746821
या स्मार्टफोनने टेक्नॉलॉजी क्षेत्रात नवी क्रांती आणली असून अनेकांना अश्चर्याचा धक्का दिला आहे.