नवी दिल्ली: मोटोरोलानं आज नवी दिल्लीत एका इव्हेंटमध्ये आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन मोटो G5 भारतात लाँच केला. मोटो G5 ची किंमत 11,999 रु. आहे. या हँण्डसेटची विक्री आज रात्री 12 वाजेपासून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉन इंडियावर होणार आहे. हा स्मार्टफोन ग्रे आणि फाइन गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे.
Moto G5 साठी खास ऑफर अॅमेझॉननं आपल्या प्राइम मेंबर्ससाठी दिली आहे. यामध्ये प्राइम मेंबर्सला 1 एक हजार रुपये कॅशबॅक मिळेल तर इतर ग्राहकांना HDFCच्या क्रेडिट कार्डवर 1000 रुपये कॅशबॅक मिळेल.


मोटो G5 स्मार्टफोनचे खास फीचर्स :
मोटो जी5 मध्ये होम बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे. यामध्ये गुगल असिस्टेंट देखील आहे.

मोटो जी5 मध्ये 5 इंच फूल एचडी (1080x1920 पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आल आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 आहे. तर 1.4 गीगाहर्त्झ स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याशिवाय 128 जीबीपर्यंत मेमरीही वाढवता येणार आहे.
मोटो G5 मध्ये 2800 mAh बॅटरी असून ही फास्ट चार्जिंग सपोर्ट करतं. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिविटीमध्ये 4 जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11, जीपीएस, ब्ल्यूटूथ 4.2, मायक्रो यूएसबी आणि 35 एमएम हेडफोन जॅक आहे. याशिवाय एक्सेलेरोमीटरही आहे.