नवी दिल्ली: मोटोरोलाने आपल्या G4 सीरिजमधील नवा स्मार्टफोन मोटो G4 प्ले भारतात लाॅच केला आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री अमेझॉनवर इंडियावर सुरु होईल.

 

सर्वसामान्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये ठेवली आहे. यापूर्वी कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केलेला x प्ले हा स्मार्टफोन सर्वात महाग स्मार्टफोन ठरला होता.

 

G4 Play या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5 इंचाचा असून त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 720 मेगापिक्सेल आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅमसोबतच 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर असून हा स्मार्टफोन 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करेल.

 

फोटोग्राफीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, तसेच 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

 

या फोनच्या बॅटरी बॅकअपसाठी 2800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G, LTE, VolTE, वाय-फाय, ब्लूट्यूथ, जीपीएस, यूएसबीसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.