मुंबई : विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ‘विराट कोहली एडिशन स्मार्टफोन’ बाजारात आले आहेत. मोटोरोलाच्या ‘विराट फॅन बॉक्स किट’चं स्वतः विराटच्या हस्ते आज मुंबईत अनावरण झालं.   मोटो जी टर्बो स्मार्टफोनच्या या विशेष मॉडेलची किंमत 16 हजार 999 रुपये असून, यातील एका खास अॅपच्या माध्यमातून चाहत्यांना विराटशी ऑनलाईन संपर्कही साधता येईल. या फोनचं अनावरण करताना विराट कोहलीने चाहत्यांसोबत गप्पाही मारल्या आहेत.   सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात क्रिकेटर्स आणि चाहते यांच्यातली दरी कमी झाली आहे. मात्र, असे असतानाही विराट अॅपच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधण्यास सरसावला आहे.