Moto Days Sale : मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2018 02:27 PM (IST)
मोटो डेज सेलमध्ये मोटो E4 प्लस (3 जीबी रॅम), मोटो X4 चे दोन्ही व्हेरिएंट आणि मोटो Z2 प्ले या स्मार्टफोन्सवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
मुंबई : फ्लिपकार्टवर मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात येत आहे. मोटो डेज सेलमध्ये मोटो E4 प्लस (3 जीबी रॅम), मोटो X4 चे दोन्ही व्हेरिएंट आणि मोटो Z2 प्ले या स्मार्टफोन्सवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हा सेल 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत सुरु असणार आहे. या सोबतच ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंत अॅडिशनल एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. मोटो E4 प्लस : या स्मार्टफोनचा 3 जीबी व्हेरिएंट आपल्याला मोटो सेलमध्ये 9,499 रुपयांना मिळणार आहे. या फोन 9,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मोटो X4 : या स्मार्टफोनचा 3 जीबी रॅम / 32 जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरिएंट या सेलमध्ये 18,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. लाँचिंगवेळी याची किंमत 20,999 रुपये होती. तर याच स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम व्हेरिएंट 20,999 रुपयात खरेदी करता येईल. ज्याची किंमत 22,999 एवढी आहे. मोटो Z2 प्ले : या स्मार्टफोनवर सर्वात जास्त सूट देण्यात येत आहे. या फोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 27, 999 रुपये किंमतीचा हा फोन आता 22,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर 2000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे.