मुंबई: ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने आपल्या बाजारातील दोन मॉडेल्सच्या गाड्या परत मागवल्या आहेत. मारुती बेलेनो मॉडेलच्या तब्बल 75 हजार 419 तर मारुती डिझायर कंपनीच्या 1 हजार 961 गाड्या कंपनीने परत मागवल्या आहेत.

 

कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेलेनो मॉडेलच्या एअरबॅग आणि डिझायर मॉडेलची इंधन प्रणाली सदोष असल्याचं आढळून आलं होतं. अशा काही तक्रारीही कंपनीकडे आल्या होत्या. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने हे पाऊल उचलल्याचं समजतं आहे.

 

मारुती सर्व ग्राहकांना एअरबॅग सॉफ्टवेअर अपग्रेड करुन देणार आहे. मारुती सुझुकीनं आपल्या नव्या बेलेनो कार 2015 साली ऑक्टोबरमध्ये लाँच केली होती. फक्त बलेनो फक्त बेलेनो नाही तर या 8 डिसेंबर 2014 आणि 18 फेब्रुवारी 2015ला तयार झालेल्या ऑल्टो K-10 या कार देखील परत बोलावल्या होत्या.