मुंबई : भारतातील ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी MIVI ने म्युझिक लव्हर्ससाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपला नवीन वायरलेस नेकबँड इअरफोन 'MIVI Collar Flash' लॉन्च केला आहे. या इअरफोनची खास गोष्ट अशी आहे की यात 10 मिमी ड्रायव्हर्स आहेत जे उत्कृष्ट साऊंड क्वॉलिटी देतात. याशिवाय ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटीही यात उपलब्ध आहे. या इअरफोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
MIVI Collar Flash किंमत?
MIVI Collar Flash वायरलेस नेकबँड इअरफोनची किंमत 1099 रुपये आहे. परंतु आपण त्याला Introductory किंमतीवर फक्त 999 रुपयात खरेदी करू शकता. अॅमेझॉन इंडियावर याची खरेदी करू शकता. इयरफोनवर कंपनी संपूर्ण एक वर्षाची वॉरंटी देत आहे. या किंमतीत आपल्याला कोणते विशेष फीचर्स मिळणार पाहुया.
अवघ्या 10 मिनिटात होणार चार्ज
MIVI Collar Flash केवळ 45 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 24 तासांची बॅटरी देतो, इयरफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतं. एवढंच नव्हे तर, केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगवर 10 तास प्लेबॅक वेळ मिळतो. म्हणजेच आपण सहजपणे कोठेही म्युझिकचा आनंद घेऊ शकता आणि आपल्याला बराच वेळ चार्ज करण्याची देखील आवश्यकता नाही.
Xiaomi शी स्पर्धा
पावरफुल साऊंडसाठी यामध्ये10 मिमी डायनॅमिक ड्राइव्हर्ससह आहेत, जे स्पष्ट आणि उच्च बास आवाज देतात. विशेष गोष्ट अशी आहे की या इअरफोनचा बास हेवी आहे आणि फ्रिक्वेंसी रेंज 20Hz -20kHz आहे. हे IPX5 रेटिंगसह येते जे धूळ, घाण आणि घामापासून संरक्षण करते. MIVI Collar Flash वायरलेस नेकबँड इअरफोन्स Xiaomi शी स्पर्धा करणार आहेत.