नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या 2850 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनी सध्या स्मार्टफोन हार्डवेअरच्या बिझनेसवरच लक्ष केंद्रीत करत असल्याचे समजते.तर दुसरीकडे कंपनीमध्ये काम करणारे काही कर्मचाऱ्यांनीही कंपनीला रामराम केला आहे.
एका रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्टमध्ये टॉप कॅमेरा एक्सपर्ट म्हणून कार्यरत असलेल्या Juha Alkarhu ने कंपनीला रामराम करून, नोकियामध्ये पुन्हा घरवापसी केली आहे.
Juha Alkarhu ने नोकियाच्या प्यूर व्यू टेक्नॉलॉजीचा कॅमेरा बनवण्यात मोठी भूमिका निभावली होती. यावेळी Juha Alkarhu नोकियाच्या व्हर्च्यूअल रिअॅलिटी ओजो व्हीआर कॅमेराचे प्रमुख म्हणून काम करणार आहेत.
कंपनीचा ब्रॉण्ड सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होणाऱ्यांमध्ये Ari Partinen यांचाही समावेश आहे. Ari Partinen यांनी काही दिवसांपूर्वी नोकिया सोडून अॅप्पल सोबत काम करण्यास सुरुवात केली होती.