नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचं ‘हिट रिफ्रेश’ या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं असून, या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती दिली आहे. यात त्यांनी लग्नानंतर आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व (ग्रीन कार्ड) सोडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच त्यानंतर त्यांनी H-1B व्हिसासाठी अर्ज केल्याचंही या पुस्तकाद्वारे सांगितलं आहे.
अमेरिकन नागरिकत्व सोडण्याविषयी नडेला यांनी लिहिलं आहे की, त्यांच्या पत्नीला अमेरिकेत घेऊन येण्यामध्ये, त्याचं अमेरिकन नागरिकत्त्व अडकाठी होत होतं. त्यामुळे त्यांनी ते परत करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या निर्णयामुळे रेडमॉन्डमधील मायक्रोसॉफ्टच्या कॅम्पसमध्ये त्यांच्यावर मोठी टीका झाली.
आपल्या करिअरच्या सुरुवातीला अमेरिकेचं नागरिकत्व असूनही मायक्रोसॉफ्टमधील नोकरीचा राजीनामा देऊन, भारतात परतण्याच्या विचारात असल्याचं सांगितलंय. कारण, अमेरिकेच्या कायद्यानुसार, एखाद्या अमेरिकन नागरिकत्व मिळवलेल्या व्यक्तीचे लग्न इतर देशातील तरुणीशी झाले, तर त्याचा व्हिसा रद्द होतो. या कायद्यामुळेच नडेला यांना त्यांची पत्नी अनु सिएटलांना अमेरिकेत घेऊन येण्यात अडचणी येत होत्या. म्हणून त्यांनी अमेरिकेचं ग्रीन कार्ड परत करुन H-1B व्हिसासाठी अर्ज केला.
नडेला यांनी अशा प्रकारचे अनेक किस्से आपल्या हिट रिफ्रेश या पुस्तकात लिहिले आहेत. या पुस्तकाचे आज अमेरिकेत प्रकाशन करण्यात आलं.
... म्हणून सत्या नडेला यांनी आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व सोडलं होतं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2017 05:20 PM (IST)
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचं ‘हिट रिफ्रेश’ या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं असून, या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -