मुंबई: भारतीय मोबाइल कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या नव्या इवोक सीरीजमधील दोन स्मार्टफोन इवोक नोट आणि इवोक पॉवर लाँच केले आहेत. इवोक नोट स्मार्टफोनची किंमत 9,499 रु. आहे. तर इवोक पॉवरची किंमत 6,999 रु. आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहेत.
इवोक नोट स्मार्टफोनचे खास फीचर्स:
मायक्रोमॅक्स इवोक नोट 4 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ ऑक्टा कोअर मीडियाटेक (एमटी 6753) चिपसेट आहे. तसेच यामध्ये 3 जीबी रॅम देखील आहे.
यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. यामध्ये 4000 mAh बॅटरी आहे.
इवोक पॉवर स्मार्टफोनचे खास फीचर्स:
या स्मार्टफोनमध्ये 5 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आलं आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं असून यामध्ये 2 जीबी रॅम आहे.
या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आमि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.