या फोनमध्ये दोन रिअर कॅमेरा आहेत. यापैकी एक 13 मेगापिक्सेल तर दुसरा 5 मेगापिक्सेल आहे. शिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
कमी किंमतीत या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. या मेटल बॉडी फोनमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल. हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये असेल. मात्र कंपनीने या फोनच्या दुसऱ्या व्हेरिएंटबाबत माहिती दिलेली नाही.
इव्होक ड्युअल नोटवर 11 हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे. तर आयडियाच्या ग्राहकांसाठीही खास ऑफर आहे. 443 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 4G डेटा मिळणार आहे.
इव्होक ड्युअल नोटचे फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
- ड्युअल रिअर कॅमेरा (13/5 मेगापिक्सेल), 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- मीडियाटेक ऑक्टाकोअर प्रोसेसर
- 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट्स
- 32GB आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट्स
- 3000mAh क्षमतेची बॅटरी