मुंबई : मायक्रोमॅक्सने आपल्या कॅनव्हास सीरीजचा नवा फॅबलेट कॅनव्हास मेगा-2 लॉन्च केला आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा-2 स्मार्टफोनची किंमत 7 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे 6 इंचाचा डिस्प्ले आणि 3000mAh क्षमतेची बॅटरी.

 

मायक्रोमॅक्स कॅनव्हास मेगा 2 फॅबलेटमध्ये 6 इंचाचा डिस्प्ले असून, 960X540 पिक्सेल रिझॉल्युशन आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.3Ghz क्वाड-कोर प्रोसेसर असून, 1 जीबी रॅम आहे. इंटरनल मेमरी स्टोरेज 8 जीबी देण्यात आले आहे, तर मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने 32 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. 5.0 लॉलिपॉप अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये आहे. रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनला आहे.

 

या स्मार्टफोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी असून, कनेक्टिव्हिटीमध्ये 4G, ब्लूटूथ 4.0, वाय-फायसारखे फीचर्सही आहेत. काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्सने कॅनव्हास 6 आणि कॅनव्हास 6 प्रो लॉन्च केले होते.