मुंबई : मायक्रोमॅक्सने काही दिवसांपूर्वीच बोल्ट सुप्रीम आणि बोल्ट सुप्रम-2 लॉन्च केले होते. आता मायक्रोमॅक्सने बोल्ड सीरीजमधील नवा स्मार्टफोन बोल्ट-सेल्फी लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने वेबसाईटवर लिस्ट केला आहे. याचसोबत फ्लिपकार्टवर एक्स्क्लुझिव्ह विक्री सुरु केली असून, या स्मार्टफोनची किंमत 4 हजार 999 रुपये आहे.


 

व्हाईट आणि शँपेन रंगांच्या व्हेरिएंटमध्ये बाजारत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा. एवढ्या कमी किंमतीत 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिल्याने स्मार्टफोनप्रेमी या स्मार्टफोनला पसंती देण्याची शक्यता वाढली आहे.

 

फीचर्स :

  • 5 इंचाचा डिस्प्ले

  • 4G सपोर्टिव्ह

  • 1GHz क्वार्ड कोर मीडियाटेक प्रोसेसर

  • 1 जीबी रॅम

  • 8 जीबी इंटरनल मेमरी

  • 170mAh क्षमतेची बॅटरी

  • GPRS

  • 3G

  • Wi-Fi

  • ब्लूटूथ

  • माइक्रो-यूएसबी कनेक्टिव्हिटी