नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात MI मॅक्स स्मार्टफोनचा फ्लॅश सेल पार पडल्यानंतर आता ओपन सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शाओमीचा एमआय मॅक्स स्मार्टफोन ऑनलाईन रिटेल पार्टनर अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, पेटीएम, स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईट उपलब्ध करण्यात आले आहे.


 

स्नॅपड्रॅगन 650, SoC, 32 जीबी स्टोरेजसोबत शाओमीने एमआय मॅक्स स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. चीनमध्ये या स्मार्टफोनचे एकूण तीन व्हेरिएंट लॉन्च केले असून, लवकरच भारतात स्नॅपड्रॅगन 652 आणि 4 जीबी व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. याची किंमत 19 हजार 999 रुपये असेल.

 

Mi मॅक्स स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलायचं झाल्या, यामध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले, मेटल बॉडी हँडसेट, 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

 

सिल्व्हर गोल्ड आणि डार्क ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4850 mAh असून, रॅमची क्षमताही जबरदस्त आहे. शिवाय, हा स्मार्टफोन 4G सपोर्टिव्ह आहे.