नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कार मेकर कंपनीने आपल्या 20 हजार 427 ‘एस-क्रॉस’ कार परत मागवल्या आहेत. या कारमधील ब्रेकचे पार्ट्स खराब असल्याची माहिती मिळते आहे.


 

एप्रिल 2015 ते 12 फेब्रुवारी 2016 दरम्यान तयार केलेल्या कार्सचा यात समावेश आहे.

 

‘एस-क्रॉस’च्या सर्व्हिस कॅम्पेनसाठी DDiS 320 आणि DDiS 200 या दोन्ही व्हेरिएंटच्या गाड्या परत मागवल्या जाणार आहेत, अशी माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे. मारुती सुझुकीकडून डिलर्सशी संपर्क साधून गाड्या मागवल्या जणार आहेत.

 

ब्रेकच्या पार्ट्समध्ये त्रुटी असून, रिप्लेसमेंटसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार नाही.

 

मारुती सुझुकी कंपनीच्या माहितीनुसार, सर्व्हिस कॅम्पेन ऑटोमोबाईल कंपनीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलं असून, गाड्यांमधील त्रुटींचा शोध यादरम्यान घेतला जाणार आहे. यात जाणाऱ्या वेळामुळे ग्राहकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.

 

एस-क्रॉस गाडीची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 8 लाख 34 हजार रुपये सुरुवातीची किंमत होती. मात्र, आता दोन डिझेल इंजिन व्हेरिएंटही बाजारात उपलब्ध आहेत.