मुंबई: नवी डिझाईन, फीचर्स आणि कमी किंमत यामुळे रेनॉल्टची क्वीड कार मागील वर्षातील सर्वात हिट छोटी कार ठरली आहे. क्वीडबाबत मिळणाऱ्या चांगल्या प्रतिक्रिया यामुळे मारुती अल्टोला मात्र चांगला झटका बसला आहे. त्यामुळे अल्टो आता नव्या लूकमध्ये येणार आहे. जी क्वीडला टक्कर देणार आहे.
क्वीड बाजारात आल्यानंतर छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये अल्टोच्या भागीदारीत घट झाली आहे. तर क्वीडनं वर्षभरात 20 टक्के हिस्सा आपल्या नावावर केला आहे. अल्टोनं आपल्या या नव्या प्रोजेक्टला Y1K नाव दिल्याचं समजतं आहे. ही आजवरची सर्वात आकर्षक अल्टो असल्याचा दावा करण्यात येत आहे. असंही समजतं आहे की, क्रॉसओव्हर डिझाइनमध्ये नवी अल्टो येण्याची शक्यता आहे. क्विडला मिळालेल्या यशामध्ये त्याच्या डिझाइनचा देखील महत्वाचा रोल आहे. नवीन अल्टो तीन वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे.
मारुती सुझुकी पुढील चार वर्षात नवे 15 मॉडेल लाँच करणार आहे. तसंच सध्या वॅगनार आणि सेलेरिओ या कारवर देखील काम सुरु आहे.
सोर्स: कार देखो डॉट कॉम
Source: cardekho.com