मुंबई : सोशल मीडियातील जायंट मानल्या जाणाऱ्या फेसबुकच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. फेसबुकवरुन माहिती लीक होणं ही मोठी चूक होती, अशी कबुली फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने दिली आहे. आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवरुन मार्क झुकरबर्गने भलीमोठी पोस्ट शेअर करत, सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.


लोकांची माहिती नेमकी कशी लीक झाली, नेमक्या कुठे त्रुटी राहिल्या, याच शोध घेऊ आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाहीही त्याने दिली आहे. फेसबुकचा वापर हा अधिकधिक रंजक व्हावा, त्यावर वेगवेगळे गोष्टी लोकांना मिळाव्यात, यासाठी फेसबुक वेगवेगळ्या अॅप्स आणि कंपन्यांना फेसबुकमध्ये परवानगी देतं. मात्र अशाच अॅप्स आणि कंपन्यांमधून लोकांची वैयक्तिक माहिती लीक होत आहे. त्यामुळे तुम्ही-आम्ही देखील आता फेसबुकचा वापर करताना, त्यावरच्या एखाद्या अॅपचा उपयोग करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.



फेसबुक लीकचं नेमकं काय प्रकरण आहे?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे. यावरुन अमेरिकेसह जगभरात आता खळबळ उडाली आहे.

केम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे?

केम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.

फेसबुकवरुन लाखो युजर्स लॉग आऊट

लाखो युजर्स फेसबुकला राम राम करु लागले आहेत. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?

वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक

'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद

डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’

फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान